टाळेबंदी काळातील भरमसाठ वीजबिलांविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे आमरण उपोषण
टाळेबंदीच्या काळात आधीच आर्थिक तसेच विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या जनतेला महावितरण तर्फे अदा करण्यात आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही वीजबिले सरसकट माफ व्हावीत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करुनही शासन दाद देत नसल्याने एकतर ही भरमसाठ वीजबिले माफ करावी अन्यथा गेली चाळीस वर्ष ज्या जमीनमालकांच्या शेतकऱ्यांच्या जागेत विद्युतवाहिन्या व खांब ऊभे आहेत त्यांना त्याचे भाडे द्यावे अशी मागणी करत मनसे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा.जितेंद्रजी चव्हाण यांनी कडवई येथील त्यांच्या निवासस्थानी आज आमरण उपोषण सुरू केले आहे.

Comments
Post a Comment