रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्पर्धंचे आयोजन
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्पर्धंचे आयोजन करण्यात आले आहे.माझे कुटुंब माझी साथ या विषयावर चित्रकला,पोस्टर,प्रतिकृती,हस्तकला ही स्पर्धा दोन गटांमध्ये 1 ली ते 12 वी दुसरा खुला गट.दुसरी निबंध स्पर्धा चा विषय कोरोना आजार प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी ही स्पर्धा 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता निबंध मराठी भाषेत 500 शब्द असावे.छायाचित्रण विषय कुटुंबाची साथ कोरोनावर मात ही खुला गटासाठी राहील.
व्हिडिओ या उपक्रमांत कुटुंबाची साथ कोरोनावर मात या विषयावर गाणी,नाटिका,एकपात्री प्रयोग अशा प्रकारामधील व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ 5 मिनिटे असावी.सेल्फि विथ कोरोना रांगोळी ही स्पर्धां खुला गटासाठी राहील.या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण 10/10/2020 पर्यंत सायं 4 वाजेपर्यंत 7057222233 या what's up किंवा https://www.facebook.com/Ratnagirimkmi या संकेतस्थळावर आपण पाठवू शकता.
प्रश्नमंजूषा स्पर्धांमध्ये कुटुंबाची साथ कोरोनावर मात या विषयावर प्रश्नमंजूषा घेण्यात येईल.यामध्ये 5/10/2020 पर्यंत शेवट नोंदणी असेल व 7/10/2020 रोजी तालुक्यास्तरावर होऊन 3 स्पर्धक निवडले जातील ते जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील अंतिम स्पर्धा 12/10/2020 रोजी व्हिडिओ काॅन्फरन्सव्दारे 3 दुपारी वाजता घेण्यात येईल अंतिम विजेता निवडला जाईल.विजेत्या स्पर्धकांना बक्षिस व कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.

Comments
Post a Comment