कोमल तानाजी घाग यांची एम.पी.सी.सी.च्या पर्यावरण विभागात राज्य सचिव पदी नियुक्ती
गेली सात वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या घन- कचरा व्यवस्थापन खात्याबरोबर सुखा कचरा वर्गीकरण या विषयावर काम करत असतानाच,दादर आणि माहिमच्या बिच वर महानगरपालिका जी.उत्तर विभागाचे अधिकारी आणि स्थानिक दिग्नीटी,ये.एल.एम. च्या माध्यमातून २०१५ पासुन बिच क्लिनअप सुरवात केली.केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या परवानगीने मुंबई शहरातील समुद्र किनाऱ्यावरील टेहळनी बुरुज,माहिमचा किल्ला,बांद्राचा किल्ला,वरळीचा किल्ला,शिवडीचा किल्ला,धारावी काळा किल्ला तसेच सायनचा किल्ला साफसफाई करण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांची मोट बांधली..
पर्यावरण संवर्धन आणि मी मुंबईकरांची सामाजिक जबाबदारी याची सांगड घालून "माझा कचरा,माझी जबाबदारी" ही चळवळ आपल्या शेकडो स्वयंसेवकांसोबत "संगम प्रतिष्ठान" या आपल्या संस्थे तर्फे उभारली.म्हणुनच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे "कोविड-१९ वारियर सन्मान्पत्राने" गौरविल्यानेच,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मोरे यानी एका युवा कार्यकर्त्याच्या कार्याला राज्य स्तरीय प्लेटफॉर्म मिळावा व पर्यावरण विभागाचा कारभार जोमात सुरु व्हावा या हेतूने "कु.कोमल तानाजी घाग "यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या "राज्य सचिव "पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीची कोणतीही हवा डोक्यात न घेता कोमल तानाजी घाग यांनी पर्यावरण विभागाच्या कामाचा सपाटाच लावला आहे..मुंबई बरोबर आता ठाणे जिल्ह्यात ही कार्यकर्त्यांची मोट बांधली आसून ठाण्याचे कॉंग्रेस चे नेते. "श्री.मनोज शिंदे" यांच्या मार्गदर्शनामधे लवलरच पर्यावरण विषयक चळवळ उभारत आहेत.या विषयावर "कोमल तानाजी घाग" यांच्याशी चर्चा केली असता अतिशय नम्र पणे त्यानी या पदाचा मान आणि सन्मान अबाधित राहील आणि माझ्या कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन केवळ मुंबईच नव्हे तर,संपुर्ण महाराष्ट्रात कोविड च्या पेन्डामीक पिरेड नंतर पर्यावरण विषयक चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे असे सांगितले.या मधल्या काळात कार्यकर्त्यांची फळी कशी "एम .पी .सी. सी." सोबत उभी राहिल यासाठीच आम्ही कटिबद्ध असल्याचेही सांगतात.कोमल तानाजी घाग यांच्या पुढील वाटाचालीस अनेकांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Post a Comment