रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस वक्ता सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन जाधव यांची नियुक्ती


 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी लांजाचे सचिन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष-जमीर मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी सचिन जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार  यांचे विचार घरा घरात पोहचवण्यासाठी या सेलच्या माध्यमातून वक्ते प्रशिक्षित करून त्यांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या सेल चे प्रदेश अध्यक्ष आणि प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेल काम करते. 

लांजा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील पवार साहेबांवर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव, चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम,जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, वक्ता सेल चे अनिरुद्ध निकम ,वक्ता सेल प्रदेश उपाध्यक्ष जमीर मुल्ला, आदींनी शिफारस प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोळुंखे यांना केली असता सचिन जाधव यांच्या नियुक्ती चे पत्र प्राप्त झाले.

Comments