महावितरण चे संजय वैशंपायन संकल्प च्या पुरस्काराचे मानकरी
महावितरण कंपनीमध्ये रत्नागिरी येथे कार्यरत असणारे श्री संजय वैशंपायन हे या वर्षीच्या संकल्प कलामचच्या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी ठरल्याचे संकल्प कलामंच यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे. श्री वैशंपायन हे महावितरण कंपनीच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी असूनही त्यांनी कोविड काळात लक्षणिय सामाजिक कार्य केले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोरोनाच्या आरटीपीसीआरटेस्ट साठी स्वाब गोळा करण्यासाठी डॉक्टरांना तोंडातील नमुना घेण्यासाठी विशेष केबिन मा. जिल्हाधिकारी मिश्रा साहेब यांच्या मार्गदर्शनाने तयार केली.
ही केबिन प्रथम रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व नंतर सर्व शासकीय रुग्णालय येथे वापरण्यात येत आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः याचे डिझाईन मागवून रायगड जिल्ह्यासाठी बूथ तयार करून घेतले . यामुळे संशयित रुग्ण व डॉक्टर यांचा संपर्क येत नसल्याने डॉक्टरवर्गला फार मदत झाली आहे.याशिवाय वॉर्ड मध्ये जाऊन औषधं, भोजन वगैरे वितरित करण्यासाठी व रुग्ण डॉक्टर संवादासाठी विशेष रोबोची निर्मिती केली आहे. याशिवाय श्री वैशंपायन यांनी लॉक डाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने हातावर पोट असलेल्या गोर गरीब जनतेसाठी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा मित्र परिवाराच्या सहकार्याने यशस्वीरित्या केला आहे.
यामध्ये जवळपास एक हजार कुटुंबांना सहाय्य लाभले आहे. कोकण परिमंडळ चे मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायानेकर, कार्यकारी अभियंता श्री बेले आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्री वैशंपायन याचे विशेष कौतुक केले आहे. सध्या श्री वैशंपायन याचे कडे महावितरण कंपनीच्या कोकण परिमंडळ जनसंपर्क अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संकल्प कला मंच यांनी श्री वैशंपायन यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांचे अभिनदन करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment