रत्नागिरी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या कारभाराची राज्यस्तरीय चौकशी होण्याची होतेय मागणी
रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सामान्य प्रशासन विभागाच्या कारभाराबाबत कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचा-यांमधुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. सामान्य प्रशासन विभागात अनेक महत्त्वाचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना रिकव्हरी लावली जाते. टायपिंगची परिक्षा उत्तीर्ण नाही असे कारण दाखवून ऐन पेंशन मिळण्याच्या काळातच प्रस्ताव रखडवून ठेवले जातात. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेंशनबाबत नुकसान सहन करावे लागत आहे. सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकारी वेळेत कार्यालयात येतात का हा देखील प्रश्न आहे. याबाबत राज्यस्तरीय चौकशी किंवा सर्वेक्षण व्हावे अशी मागणी होत आहे.

Comments
Post a Comment