सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला फॉग मशीन ची भेट

 


जिल्ह्यात कोव्हीड चा प्रादुर्भाव वाढत असतानाच डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेत असलेल्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रति सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या कार्याला सलाम म्हणुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला सनेटाईज करण्यासाठी उपयुक्त असलेले फॉग मशीन भेट म्हणुन देण्यात आले .

या पुढे पोलीस बांधवांसाठी जे जे लागेल ते राष्ट्रवादी काँग्रेस चे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आ.श्री शेखर निकम,  जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव, मा.आ.संजय कदम राष्ट्रवादी चे नेते श्री राजाभाऊ लिमयें, कुमारजी शेट्ये, बशीरभाई मुर्तुझा,तालुकाध्यक्ष श्री नाना मयेकर,जिल्हाउपाध्यक्ष श्री  मिलिंदजी कीर,महिला तालुकाध्यक्ष शमीम ताई, शहर अध्यक्ष श्री निलेश भोसले,महिला शहर अध्यक्ष नेहालीताई नागवेकर, रामभाऊ गराटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मिळवून देईलच असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मोहितकुमार गर्ग यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू यांनी दिला

त्या वेळी  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य श्री बशीर भाई मुर्तुझा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू, रत्नागिरी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष निलेश भोसले, महिला तालुकाध्यक्ष शमीमताई नाईक, महिला शहर अध्यक्ष नेहाली ताई नागवेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष श्री मंदार नैकर, श्री संकेत देसाई, विध्यार्थीचे ऍड साईजीत शिवलकर, पप्पु तोडणकर,सुरज शेट्ये रुपेश आडिवरेकर,मिलिंद माळवदे, संदीप रहाटे, आदी उपस्थित होते

Comments