रत्नागिरी शहरातील राजापूरकर कॉलनी येथील रस्त्यावर असंख्य खड्डे, गटारे उघडीच

 


रत्नागिरी शहरातील राजापूरकर कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून या भागातील नागरीकांमधून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. राजापूरकर कॉलनी परिसरात असंख्य घरे, धार्मिक स्थळे, खाजगी दुकाने, छोटे व्यावसायिक आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते. मात्र या मार्गावर असंख्य खड्डे पडले असल्याने मार्गावरुन प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. 

तसेच रस्त्याच्या बाजुला एक मोठे गटार आहे. मात्र हे गटार उघडे असल्याने आजुबाजुला दुर्गंधी पसरली आहे. हे गटार बंदिस्त करण्यात आलेले नाही. दुर्गंधीमुळे परीसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने या समस्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे.

Comments