रत्नागिरी जिल्ह्यात ८५ नवे कोरोना बाधित, ६ मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी ८५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या ७२६७ झाली आहे . ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा २५६ झाला आहे . उपचारानंतर बरे झालेल्या ५० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या ६०६६ झाली आहे .
पॉझिटिव्ह ८५ रुग्णात गुहागर - ७ , चिपळूण - २५ , संगमेश्वर - १० , रत्नागिरी - ३० , लांजा - १ आणि राजापूर - ३ अशी संख्या आहे . खेड - २ , दापोली - १ , चिपळूण - १ , रत्नागिरी - १ , लांजा - १ अशी मृतांची आकडेवारी असून जिल्ह्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा २५६ झाला आहे .

Comments
Post a Comment