बियाणे राखून ठेवण्याबाबत मार्गदर्शन सूचना


शेतकऱ्यांनी दरवर्षी नवीन बियाणे खरेदी केल्याने त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. परंतु सुधारित वाण एकदा खरेदी केल्यानंतर तीन वर्षे त्याचा वापर करता येतो. बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.

1एकरचा विचार केला तर त्याकरिता शेतकऱ्यांना 16 किलो सुधारित भात बियाणे आवश्यक असते. सदर16 किलो भात बियाणे शेतकऱ्यांना अर्धा गुंठा क्षेत्रातून मिळेल. त्याप्रमाणात शेतकऱ्यांना पुढील हंगामात भाग लागवड क्षेत्राकरिता आवश्यक असेल तेवढे बियाणे साठवून ठेवू शकतात. बियाण्याचे क्षेत्र निवडताना आपल्या लागवड क्षेत्रातून भेसळमुक्त क्षेत्र निवडावे.निवडलेले क्षेत्र हे वेळोवेळी खुरपणी करुन तणमुक्त ठेवावे. निवडलेल्या क्षेत्रावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव नसावा. 

सदर क्षेत्राची कापणी, वाळवणी, झोडणी स्वतंत्रपणे करुन घ्यावी आणि त्यातील आर्द्रता निघून जाईपर्यंत भात उन्हामध्ये सुकवावे व बीजप्रक्रीया करुन पुढील हंगामाकरिता व्यवस्थितरित्या साठवणूक करुन ठेवावे. यामुळे शेतकऱ्यांच्या बियाणे खर्चात बचत होवून दर्जेदार बियाणे उपलब्ध होईल आणि बाजारात होणारी फसवणूकही थांबेल असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे

Comments