आजचे बातमी पत्र

  • १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा गव्हर्मेंट कॉन्ट्रक्टर असोसिएशनचा इशारा, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करोडो रूपयांची बिलं मिळत नसल्यानं कंत्राटदार हवालदिल
  • कुरूंदवाड ते तेरवाड रस्त्यावर दोन मोटारसायकलींची धडक, तेरवाडमधील २५ वर्षीय आकाश रमेश गोसावी या तरूणाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्या मोटरसायकलवरील सुनील सिताराम गोसावी गंभीर जखमी
  • युध्दविरामाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं भारतीय शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ९३१ अंकांनी घसरून ७६ हजार ६३१ वर, तर २२२ अंकांनी घसरलेला निफ्टी २३ हजार ७७५ वर
  • कोल्हापूर शहरातील अनधिकृत बांधकामांवर आणि ज्यांच्या काळात अनधिकृत बांधकाम झालं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कोल्हापूर नेक्स्टची मागणी
  • समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशानंतरही राजकीय वाट बिकट, २०२९ च्या निवडणुकीपर्यंत अनेक फाटे आणि घडामोडीची शक्यता
  • हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅममधून २ हजार २४० कोटीचं अर्थसहाय्य, तर पूर मुक्तीसाठी इचलकरंजीला मिळणार ४५० कोटी रुपये
  • पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या अडीच वर्षाच्या अन्विक जाधव या चिमुकल्याचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू, मातापित्यांचा आक्रोश
  • कोल्हापूरकरांचा नादच खुळा, शिवाजी पेठेच्या म्हाईमध्ये ४ हजार किलो मटणावर ताव
    • कोल्हापूर महापालिकेच्या १८ कोटी रुपयांचा जीएसटी अनुदानासह राज्यातील २७ महापालिकांचं मार्च महिन्यातील अडीच हजार कोटी रुपये जीएसटी अनुदान थकित


    • आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था आणि व्यक्तींकडून कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून झालं अन्नदान


    • कोल्हापुरातील बुध्द गार्डन मधील बेकायदेशीर वृक्षतोडीबद्दल त्या ठेकदारावर गुन्हा दाखल करावा, हिंदू विधीज्ञ परिषदेची मागणी
    • जगभर प्रेम, विश्वशांती आणि सद्भावना वाढीस लागावी, यासाठी कोल्हापुरातील जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीनं झाला नवकार महामंत्र उपक्रम
    • सीएसआरच्या माध्यमातून होणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामाचं विविध संस्थांनी केलं चित्रफितीद्वारे सादरीकरण
    •                 जुन्या घराची दुरुस्ती सुरु असताना स्लॅब कोसळून दोन कामगार जखमी,कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील दुर्घटना
    •            महापालिकेच्या विविध प्रकल्पांची आणि कामांची आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली पाहणी, अतिक्रमणं हटवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
    •            मंदिरातील सुरक्षा रक्षक असल्याचा बहाणा करून अंबबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या भामटया महिलेला अटक.
      .

टिप्पण्या