कंपनीने टाकलेला गरम मातीमुळे महिलेचा मृत्यू, लोटे एम आय डी सी मधील प्रकारामुळे खळबळ, मार्च महिन्यात घडलेल्या घटनेबाबत २ एप्रिल रोजी गुन्हा नोंद, महिलेचा कोल्हापूर सी पी आर हॉस्पिटल येथे मृत्यू
लोटे एम आय डी सी परिसरातील एका कंपनीच्या गलथान कारभारामुळे शकुंतला सोनवणे यांचा जीव गेला. पण गुन्हा नोंद करायला एवढा उशीर का झाला असा सवाल सध्या खेड तालुक्यात उपस्थित केला जात आहे.
चिपळूण तालुक्यातील बहादूर शेख नाका, मूळ राहणार पाचगणी, जिल्हा सांगली लयेथील शकुंतला बबन सोनवणे वय 48 वर्षे या लोटे एम आय डी सी मधील एका कंपनीच्या बाहेर बाजूच्या आवारात गेल्या होत्या. त्यावेळी सदर कंपनीमधून बाहेर उघड्यावर टाकलेल्या केमिकलयुक्त गरम माती मध्ये आतमध्ये रुतून त्यांच्या अंगावरील साडी, इत्यादी कपडे जळून कमरेपासून खाली शरीर व दोन्ही हात भाजल्यामुळे त्यांना कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद ललिता चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मार्च महिन्यात घडली होती. मात्र याबाबतचा गुन्हा दिनांक २ एप्रिल रोजी खेड पोलिस ठाणे येथे नोंद करण्यात आला. त्यामुळे गुन्हा नोंद व्हायला एवढा उशीर का झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी सदर कंपनीशी संबंधित तीन जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५, ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा