राजापुरातील तहसील आणि प्रांत कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेटच नाहीत?

राजापूर तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना HSRP नंबर प्लेटच नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच आहेत का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स बसवणे बंधनकारक केले आहे. यासंबंधीचे नियम न पाळल्यास पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. HSRP नंबर प्लेट्स न बसल्यास आर टी ओ विभागाकडून गाडी जप्त सुद्धा केली जाऊ शकते. ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाहीत अशा वाहनांचे नूतनीकरण प्रक्रिया सुद्धा अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट्स बसवणे बंधनकारक आहे.

मात्र वाहतूक पोलिस शाखा सर्वसामान्य जनतेच्या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट्स नसल्या तर कारवाई करत आहे. मात्र राजापूर तालुक्यातील काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स म्हणजेच HSRP नंबर प्लेट्स नसल्याची बाब समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना काही वेगळा नियम आहे की काय असा सवाल सध्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

टिप्पण्या