राजापुरातील भू गावात अनधिकृत बांधकामांना ऊत, असेच होत राहिले तर सगळ्या तालुक्यातच लोक अनधिकृत बांधकामे करू लागतील, बांधकाम विभागाकडे तक्रारी दाखल

राजापूर तालुक्यातील भू गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांच्या बाजूला अनधिकृत बांधकामे सुरू असून यासंदर्भात तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. अशीच अनधिकृत बांधकामे होत राहिली तर ही प्रथा सगळ्या तालुक्यात पसरू लागेल. त्यामुळे संबंधित विभागांनी रस्ते, पायवाटा या ठिकाणी अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

तालुक्यातील भू गावात रस्त्याच्या बाजूलाच काही लोकांनी परमनंट स्ट्रक्चर करून बांधकामे केली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात बांधकाम विभागांना जर रस्त्याचे रुंदीकरण अथवा वाढीव रस्ते करायचे असतील तर त्याला त्रासच होऊ शकतो. नवीन नगर रचना नियमानुसार कुठचेही बांधकाम करायचे असेल तर नगररचना विभागाची व तहसील कार्यालयाची परवानगी आवश्यक असते. त्यानुसारच बांधकाम करावी लागते अन्यथा ते अनधिकृत बांधकाम ठरते. भू पंचक्रोशी मध्ये जर अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे रस्त्यावरच होऊ लागली तर ही प्रथा संपूर्ण तालुक्यातच पसरू लागेल आणि रस्त्या रस्त्याला लोक अनैतिकृत बांधकामे करू लागतील. रत्नागिरीमध्ये अनधिकृत बांधकामावर िथल्या प्रांताधिकार्‍यांनी कारवाई करून जेसीबीच्या माध्यमातून सगळी अनधिकृत बांधकामे पाडले आहेत. मुंबई गोवा हायवे किंवा मीरा नागपूर हायवे च आजूबाजूला ज्या लोकांनी अनधिकृत बांधकामे व्यापारी गाळे परमनंट स्ट्रक्चर करून बांधले होते ते जेसीबी चे साह्याने पाडण्यात आले अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

त्यामुळे संबंधित प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदींनी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे होऊ नयेत याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. 

टिप्पण्या