ठळक वैशिष्ट्ये

         महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची महापालिका सभागृहात पोलखोल, चोरीची कनेक्शन, परस्पर वसुली आणि अभय योजना यावर गाजली महापालिकेची विशेष सभा
          अनधिकृत नळ जोडणीवर कठोर कारवाई करणार, अन्यथा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसानीची वसुली करणार, महापौर रुपाराणी निकम यांचा इशारा

         करूळ घाटात भीषण अपघात, सिमेंटचा ट्रक खोल दरीत कोसळल्यानं विजापूरमधील बाप-लेकाचा जागीच मृत्यू

              जोतिबाचं दर्शन घेवून घरी परतणाऱ्या दुर्गमानवाडमधील ३८ वर्षाचा अरूण गुरव पंचगंगा नदीत बुडाला, शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या अरूणचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून कसून प्रयत्न

             गोकुळच्या निवडणुकीबद्दल योग्य वेळी भूमिका स्पष्ट करू, नामदार हसन मुश्रीफ यांची भूमिका, तर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवावं, नामदार मुश्रीफ यांचा टोला
               फुलेवाडी रिंग रोडवरील सुपर बाजारला शॉर्ट सर्किटनं आग, सुमारे २० लाखाचं नुकसान
          हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या मारूती मंदिरांमध्ये मोठी गर्दी
         कोल्हापुर शहरात तुरळक तर काही तालुक्यात मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस वळीव पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता
                पर्यटनासाठी आलेल्या तरूणावर काळाचा घाला, काळम्मावाडीमधील दूधगंगा नदीच्या डोहात बुडून २१ वर्षाच्या अभिषेक कांबळेचा मृत्यू.सध्याच्या युध्दजन्य परिस्थितीत भगवान महावीरांचे विचार देशाला तारक, डॉ. विजय ककडे यांचं प्रतिपादन
            नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २८७ कोटी ६५ लाख रुपयांचा ढोबळ नफा, बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती
        सीएसआर निधीतून कोल्हापूर शहरात होणाऱ्या विविध विकास कामांचं ९ एप्रिलला होणार सादरीकरण
चैत्र यात्रेच्या निमित्तानं श्री जोतिबा चरणी लीन झालेले भाविक निघाले परतीच्या वाटेला, अंगावर गुलाल आणि मुखात चांगभलंचा गजर
                महापालिकेच्या स्थायी समिती सभेत वृक्षतोड ठेकेदार नेमण्याविषयी झाली खडाजंगी चर्चा, योग्य काम करणाऱ्या कंपनीला येत्या आठ दिवसात ठेका देण्याचा सभापतींचा निर्णय

स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित,                                                           लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेमुळं लोकशाहीसमोर संकट निर्माण होण्याची भीती, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं मत
        बुधवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळं अनेक झाडं पडून लाखोंचं नुकसान, २२ ठिकाणी महापालिकेची राबली यंत्रणा
        कोल्हापूर सेंट्रल बस स्थानक परिसरातील रिक्षा स्टॉपवर झाली फ्री स्टाईल हाणामारी
        चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून निघणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण.

टिप्पण्या