आजचे दिनविशेष
पाणीपट्टी वाढ करण्याचा आणि गुंठेवारी नियमितीकरणासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेकडं जाणार, महापालिका स्थायी समिती सभेत निर्णय
महापालिकेच्या स्थायी समिती सभेसाठी सर्व अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावं, अन्यथा कारवाई करण्याचा नगरसेवकांचा इशारा
कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडलं संसदेत विधेयक, स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्चित करण्याचा प्रयत्न
वाढत्या उन्हाळ्यामुळं विजेची मागणी वाढली, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भारनियमन सुरू होण्याची शक्यता, वीज गळती असलेल्या जिल्हयांमध्ये भारनियमन सुरू होण्याची चिन्हं
आठ दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ९३८ अंकांनी वधारला, तर निफ्टी २५७ अंकांनी वाढला
भारतीय सण म्हणजे निसर्गाशी मैत्री, गुढी पाडव्यानिमित्त बांबु आणि कडुलिंब रोपाचं संगोपन करा, निसर्ग मित्र संस्थेचं आवाहन
पर्यटन क्षमतेत भर घालणाऱ्या कागलमधील कासव धबधब्याचं झालं शानदार सोहळ्यात उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी केली पाझर तलाव सुशोभिकरणाची पाहणी
तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, भारतात समान नागरी कायदा येईल, आदमापूरच्या भंडारा यात्रेत कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक
काळम्मावाडी धरणाजवळील दूधगंगा नदीच्या डोहात बुडून कोल्हापुरातील ३३ वर्षाच्या हर्षवर्धन केदार यादवचा मृत्यू, नदीच्या धोकादायक डोहाजवळ सुरक्षा रक्षक ठेवण्याची गरज. महामार्गावर केलेल्या हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांची मतं जाणून घेणार.......
कासव धबधबा उद्घाटन समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारचं कृष्णराज महाडिक यांनी केलं सारथ्य
आदमापूरच्या भंडारा यात्रेत लस्सीमुळं झाली ४३ भाविकांना विषबाधा, उपचारानंतर ३३ जणांना सोडलं घरी, १० रुग्ण उपचाराधीन
कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल पथकाच्यावतीनं गुढीपाडव्याला निघणार भव्य शोभायात्रा, पारंपारिक लवाजम्यासह घुमणार ढोल-ताशांचा निनाद
छत्रपती श्री शाहू मिल प्रश्नी राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी जिल्हयातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेण्याचा कृती समितीचा निर्णय
गॅस दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीनं झालं शंखध्वनी आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालसमोरील फुटपाथवर चुल पेटवून बनवलेली पिठलं-भाकरी दिली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना
इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याची २ कोटी ३६ लाखांची फसवणूक, राजस्थानमधील संशयित व्यापाऱ्याला अटक
गुढी पाडव्यानिमित्त श्री अंबाबाई देवीला ३५१ रूपयांची ओटी भरा आणि पुण्य मिळवा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळं कोल्हापुरात तीव्र नाराजी
इचलकरंजीतील घंटागाडीवरील कामगारांच्या आंदोलनामुळं कचरा उठावाचं काम ठप्प.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा