आजच्या दिवसातील घडामोडी

  • जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी परितेसह ५२ गावांतील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याची मागणी
  • स्थायी समिती सभापतींकडून कोल्हापूर महानगरपालिकेचं अंदाजपत्रक महासभेला सादर, पर्यावरणपूरक वाहतूक, पूरमुक्त कोल्हापूर, सुरक्षित शहर प्रकल्प आणि आधुनिक सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मनोदय
  • पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबवणार, नामदार हसन मुश्रीफ, ग्राहकांना शून्य वीज बिलासह पर्यावरण रक्षणाला लागणार हातभार
  • भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा त्सुनामी, सेन्सेक्स १ हजार ६३६ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं १० लाख कोटी रूपयांचं नुकसान, डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपया ९५ रूपये २२ पैशावर
  • घरफोडी करणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक, ७ घरफोडीचे गुन्हे उघड, १० तोळे सोने, २३० ग्रॅम चांदी असा सुमारे २१ लाखांचा ऐवज जप्त
  • जोतिबाच्या चैत्र यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी, मंगळवार पासून सलग ३ दिवस मंदिर अहोरात्र खुलं राहणार
  • २० गुंठे जमिनीच्या वादातून मुलानं घेतला जन्मदात्या वडिलांसह भावाचाही जीव, आरोपी संभाजी कुंडले आणि त्याचा २० वर्षाचा मुलगा विवेक पोलिसांच्या ताब्यात
  • जिल्हा परिषदेची शिक्षण आणि अर्थ समिती जनसुराज्य शक्ती पक्षाकडं, बांधकाम - आरोग्य समिती शिंदे गट शिवसेनेला तर महिला-बालविकास सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला, यड्रावकर गटाला समाजकल्याण समितीचं सभापती पद.. 



  • मुली आणि मुलांना गुड आणि बॅड टच संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचा पुढाकार
  • कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तसंच गिर्यारोहक राजश्री जाधव-पाटील ४ एप्रिलपासून सुरू करणार माऊंट एव्हरेस्टची मोहिम
  • भाजप युवा मोर्चा संघटनेत विविध क्षेत्रात काम करण्याची संधी, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक
  • अवसायनात काढलेल्या एक हजार पेक्षा अधिक दूध संस्थांची बाजू येत्या १५ दिवसात ऐकून घेणार, सहाय्यक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांची माहिती
  • सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्ताची मागणी करण्यासाठी आलेल्या प्रकाश बेलवाडे यांना गोकुळच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच रोखलं, बेलवाडे यांचं गोकुळच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
  • शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांची जयसिंगपूरमधील महावितरण कार्यालयावर धडक, आमदारांचं बिल थकीत असताना वीज पुरवठा का तोडला नाही, शेतकऱ्यांचा सवाल
  • हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत राज्याच्या अनेक भागात वळीव पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस गारपिटीचा अंदाज
  • भगवान महावीर जयंतीनिमित्त झाला रथोत्सव, श्रावक-श्राविकांचा भक्तीमय सहभाग
  • मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनाही प्रभावीपणे राबवणार, नामदार हसन मुश्रीफ
  • कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यावर भर, तर महापालिकेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकडं प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी
  • केएमटी च्या ६४ बसेस येत्या डिसेंबर महिन्यात स्क्रॅप होणार असल्यानं, डिझेलवर चालणाऱ्या नवीन ७५ बस घेण्याची परिवहन सभापतींची मागणी.

टिप्पण्या