मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांची दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांची दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार Nilesh Narayan Rane यांची दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात आनंद व्यक्त होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन जबाबदारीमुळे दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यास तसेच जनतेशी थेट संपर्क वाढवण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार राणे यांचा आतापर्यंतचा सक्रिय व जनसंपर्कावर आधारित कामाचा अनुभव या भूमिकेत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रविण किणे यांनीही आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकीय क्षेत्रात ही नियुक्ती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, संघटनात्मक बळकटीसाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो.

टिप्पण्या