रत्नागिरी शहरातील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर जयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर जयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जैन समाजाच्या मोठ्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व विविध उपक्रमांनी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले.
भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, शांतिधारा व विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात भव्य आरती व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. समाजातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय या पंचमहाव्रतांचा संदेश देण्यात आला. त्यांच्या शिकवणीवर चालत समाजाने शांतता, प्रेम आणि सहकार्य यांचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
महावीर जयंती हा जैन समाजातील सर्वात महत्त्वाचा सण असून भगवान महावीरांच्या जन्मदिनानिमित्त तो साजरा केला जातो. या दिवशी भक्त मंदिरात जाऊन पूजा, प्रार्थना व दानधर्म करतात.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात “जय जिनेंद्र” चा घोष घुमत होता आणि रत्नागिरीत भक्ती, श्रद्धा व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
संस्थापक उपाध्ये, संस्थेचे उपाध्यक्ष बागी, सचिव शिराळकर
असे अनेक भक्त उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा