आजची बातमी पत्र

कोल्हापूर शहरासह जिल्हयाच्या ग्रामीण भागात वळीव पावसाची हजेरी, ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसानं रब्बी पिकांना धोका
बिद्रीतील श्रध्दा हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आणखी सहा एजंटना अटक, मुख्य सुत्रधार डॉ. उत्तम सरदेसाई अजुनही फरार

कोल्हापूर जिल्हयात आणखी एक औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी शासनाकडं प्रस्ताव, महामार्गाची दुरावस्था, गॅस टंचाई यासह उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील, आमदार अमल महाडिक यांची माहिती

परिते भाविकांना झालेली मारहाण आणि बदनामी विरोधात ३० मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा, पुजारी हटाव-जोतिबा बचाव मोहि राबवण्याचा परिते ग्रामस्थांचा निर्धार 
     इचलकरंजी महापालिकेचं ३२ लाख ६७ हजार रुपयांचं शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर, महापालिकेचं उत्पन्न वाढवणं आणि खर्चात काटकसर करण्याच्या सूचना
शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे, सेन्सेक्स १ हजार ६९० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना साडे आठ लाख कोटी रुपयांचा फटका
शेत रस्ता अडवला, तर आधार कार्ड ब्लॉक आणि सरकारी योजनाही बंद, राज्य सरकारचा निर्णय

टिप्पण्या