आजच्या बातमीपत्र
तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्याजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आयोजित बैठकीला महापालिकेचे अधिकारी गैरहजर, कृती समितीनं केला निषेध
सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्यावतीनं राम नवमी उत्सवाला प्रारंभ, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, विश्वशांती होम संपन्न
उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणं बंधनकारक, पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांचा इशारा
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून यकृतातील दोन मोठया गाठी काढण्यात अॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश, आधुनिक तंत्रज्ञानाचा रूग्णांना फायदा
कोल्हापूर शहरातील मुख्य चौक, रस्ते दुभाजक, स्वच्छतागृहं, शाळा आणि उद्यानं विकसित करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांची तयारी, महापौरांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांना प्राधान्यानं गॅस सिलिंडरचा पुरवठा व्हावा, व्यावसायिकांची जिल्हा प्रशासनाकडं मागणी
महिलांना मिळणार शिलाई व्यवसायाचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण, मोफत शिलाई मशिन देऊन व्यवसायासाठी मिळणार पाठबळ सौ. अरूंधती महाडिक यांची ग्वाही, करवीर तालुक्यातील वडणगे इथं प्रशिक्षण केंद्राची सुरवात
घरातील तुळीला ओढणीनं गळफास घेऊन महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे इथली घटना
कागल तालुक्यात वळीव पावसाची हजेरी, उष्णतेपासून काहीसा दिलासा, शेतकरी वर्ग सुखावला
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील अ संघाचा तुल्यबळ प्रॅक्टिस क्लबवर २-० गोलनं विजयी, पाटाकडील अ संघ पोहोचला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा