आज चे बातमी पत्र
पेट्रोल-डिझेल टंचाईची अफवा, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांची उसळली गर्दी, मात्र जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन
पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा खंडित होऊ देणार नाही, महापौर रूपाराणी निकम यांची ग्वाही, कोल्हापूरच्या पाणी प्रश्नावर महापालिकेच्या चौकात झाली पाणी परिषद
रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक, शिरढोणजवळ झालेल्या अपघातात कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या अॅड. वंदना आणि संतोष गायकवाड या दांपत्याचा मृत्यू
अज्ञात वाहनानं स्कूटरला पाठीमागून ठोकरल्यानं झालेल्या अपघातात मौजे सांगावच्या ३० वर्षीय पल्लवी पाटील यांचा जागीच मृत्यू, लक्ष्मी टेकडी इथं झाला अपघात, गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावर कूर इथं टेम्पोच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी
पाच दिवस युध्दबंदी जाहीर झाल्यानं भारतीय शेअर बाजाराला मोठा दिलासा, सेन्सेक्स १ हजार ३७२ अंकांनी वाढून ७४ हजार ६८ वर, तर ३९९ अंकांची वाढ घेऊन निफ्टी २२ हजार ९५७ वर
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंबंधी शासन सकारात्मक, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच १० गावांचा समावेश करून हद्दवाढीचा निर्णय घेऊ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधिमंडळ सभागृहात घोषणा
सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार, ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण
हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांना प्राधान्यानं गॅस पुरवठा करावा, व्यावसायिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडं मागणी.
- भारतात दर तीन मिनिटाला आढळतात दोन क्षयरोगी, मात्र योग्य आहार-विहार आणि नियमित औषधांनी क्षयरोगावर करता येते मात, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
- मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा पातळ्यांवर चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलाच, राजकारण आणि समाजकारणात टिकतील, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचा विश्वास
- गॅस दर कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पुढाकारातून रिक्षा व्यावसायिकांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्च
- पावती देऊनही गॅस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या संभाजीनगरमधील संदीप गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांचा संताप, रास्ता रोको करून केला गॅस एजन्सीचा निषेध
- पळवून नेलेल्या जैन समाजातील त्या मुलीला अखेर शाहूपुरी पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतलं ताब्यात, मुलीला पालकांच्या स्वाधिन करून मुलगा पोलिसांच्या ताब्यात
- अवैध गर्भलिंग निदान होत असल्याबद्दल बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा, डॉक्टर आणि एजंट अटकेत, तर सोनोग्राफीचं मशीन आणि काही औषधं जप्त
- कृष्णा योजनेतून पाणी उपशाचे १ कोटी रुपये इचलकरंजी महापालिकेनं दिल्यानं पाटबंधारे विभागाची कारवाई तुर्तास तरी टळली
- युध्दात जखमी झालेल्या सैनिकांना वॉर वुंडेड फौंडेशनच्यावतीनं २५ मार्च रोजी गतीशिल साधनाचं होणार वितरण
- महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी झालं चुरशीनं मतदान.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा