आजचे दिन विशेष
- जोतिबा मंदिर प्रांगणात झालेल्या भाविक आणि पुजारी यांच्यातील तुफान हाणामारीनंतर ३० जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, पुजारी वर्गाच्या समर्थनासाठी जोतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार राहिले बंद
- जोतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते ग्रामस्थांनी काढली निषेध फेरी, सखोल चौकशी करून दोषी पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
- बांधकाम कामगारांसाठी लागू असलेल्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करा, बांधकाम कामगारांचा निघाला धडक मोर्चा, तळपत्या उन्हात लाल वादळाची प्रचिती
- आखाती युध्दाचे शेअर बाजाराला धक्के, सेन्सेक्स १ हजार ८३६ अंकानी घसरुन ७२ हजार ६९६ वर, तर ६०१ अंकांनी घसरलेला निफ्टी २२ हजार ५१२ वर, गुंतवणूकदारांचं १३ लाख कोटींचं नुकसान
११ लाख ४५ हजार रूपये शिल्लकीचं के. एम.टी.चं अंदाजपत्रक सादर, डिझेलच्या ४८ आणि नव्या ४० इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार, टप्प्याटप्प्यानं सर्व ई बसेस वापरण्याचं नियोजन
- कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत महापालिकेच्या जलअभियंत्यांना घेराव, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या आंदोलनानंतर फिल्टर हाऊसच्या सुधारणांची कामं सुरू करण्याची ग्वाही
- आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीमुळं शेतमालाची निर्यात ठप्प, कांदा-बटाट्याचे दर घसरले, बळीराजाचं आर्थिक गणित कोलमडलं
- जाज्वल्य देशभक्त शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचं प्राणार्पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अजरामर, शहीद दिनाच्या निमित्तानं बी न्यूजचं विशेष वृत्त...
संवाद-प्रतिवादमध्ये आज रात्री १० वाजता पहा, पश्चिम आशियातील युध्दजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतावर परिणाम,
कागल तालुक्यातील बिद्री परिसरातील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा, गर्भलिंग तपासणी आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या संशयावरून कारवाई, एका एजंटासह सोनोग्राफी मशिन आणि संशयास्पद औषधं जप्त
कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांचा राजीनामा, जिल्हा उपनिबंधकांकडं केला सुपूर्द
कागल नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची माहिती देण्यास टाळाटाळ, आरटीआय कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांचा आरोप
विश्वपंढरी इथं विश्वकोटी कुंकूमार्चन महायज्ञ संपन्न, हजारो भाविकांनी लावली उपस्थिती
देशाच्या एकात्मतेला जिहादी प्रवृत्तीपासून धोका, सामाजिक कार्यकर्ते निलेश धायरकर यांचं डॉ. हेडगेवार व्याख्यानमालेत मत
जगात भारी कोल्हापुरी म्हणण्यापेक्षा त्याचं ब्रँडिंग करावं, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं चैत्र पाडवा मेळाव्यात आवाहन
उस्ताद अल्लादिया खाँ संगीत महोत्सवात विदुषी सावनी शेंडे यांचं गायन आणि पंडित ब्रिज नारायण यांचं सरोद वादन ऐकण्यासाठी जाणकार रसिकांची मोठी गर्दी, दोन दिवसांच्या संगीत महोत्सवानं कानसेनांना पर्वणी
विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्यावतीनं २४ ते २६ मार्च या कालावधीत छत्रपती शिवाजी चौकात रामनवमी उत्सवाचं आयोजन
कोल्हापुरात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाची पाळंमुळं पोलिसांनी खणून काढावीत, भाजप युवा मोर्चाची मागणी
दुर्गम डोंगरी भागातील नागरिक आणि गॅस कनेक्शन नसलेल्या नागरिकांना प्राधान्यानं रॉकेल मिळणार, रॉकेल विक्रेते आणि हॉकर्सच्या बाबतीत शासनाचं लवचिक धोरण
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धत खंडोबा तालीम मंडळाचा जुना बुधवार पेठ तालमीवर विजय, खंडोबा संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा