आजच्या घडामोडी

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पशुपालकांना शासनाचा मदतीचा हात, मदतीच्या अटी शर्ती रद्द करून सरसकट मदत देण्याचा फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शाहू मिलच्या पुनरूज्जीवनासाठी आराखडा बनवावा, पालकमंत्री आणि जिल्हयातील आमदारांनी मुख्यमंत्र्याबरोबरच बैठक घेवून तत्वतः मान्यता घ्यावी, खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची सुचना

२०२७ च्या जनगणनेनंतरच १० गावांचा समावेश करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल, आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

गॅस सिलेंडर टंचाईमुळं हॉटेल मालक धास्तावले, बहुतांश हॉटेलचा मेनू आला केवळ २५ टक्क्यांवर, गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती
बिद्रीतील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढली, आणखी तीन एजंट अटकेत, डॉक्टर युवराज पाटीलसह एकूण अकरा जणांभोवती फास, फॉरेन्सीक लॅबकडून हॉस्पिटलची तपासणी

सिद्धगिरी मठावर कारागिरांचा महाकुंभ, ३१ मार्च ते ४ एप्रिल या काळात देशभरातील दोनशे कारागिर येणार एकत्र
घटस्फोटाच्या तारखेसाठी न्यायालयात आलेल्या पक्षकार आणि महिला वकिलातील मारामारी प्रकरणी १५ वकिलांविरोधात गुन्हा दाखल
शाहुवाडी तालुक्यातील साळशी इथं जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एका म्हैशीचा होरपळून मृत्यू
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत युजलेस जीनियस नाटकाला प्रथम क्रमांक, तर मी कुमार आणि सूर्य पाहिलेला माणूस या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर.
  • मॉब सायकॉलॉजी पुन्हा एकदा स्पष्ट, दोन ते तीन दिवस पेट्रोल पंपांवर झाली प्रचंड गर्दी आणि रांगा, सर्वच पेट्रोल पंपांवर आता सामान्य चित्र
  • सराफी व्यवसायात वाढत चाललेल्या स्पर्धेला घाबरून न जाता ग्राहकांना विश्वासार्ह सेवासुविधा पुरवाव्यात, सराफ अनिल दंडे यांचं आवाहन, सराफ सुवर्ण कारागिर संघाचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न
  • कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या शिवाजी तरुण मंडळाच्यावतीनं पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान

  • स्मृती एंटरप्रायझेस प्रस्तुत मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी स्पर्धेला जिल्ह्यातील तरूणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांकडून सौंदर्य आणि गुणवत्तेचं सादरीकरण

  • ईपीएस-९५ पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर झालं धरणं आंदोलन
  • राधानगरी तालुक्याला वळीव पावसाचा तडाखा, सूर्यफूल आणी वेलवर्गीय पिकांचं मोठं नुकसान, तर हुपरीमध्ये वांगी आणि दोडका पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याचं सुमारे ५ लाखाचं नुकसान
  • ब्लूमिंग बड्स पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा संपन्न, गुणवतांचा सत्कार आणि गीत संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कारानं रंगलं संमेलन
  • दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मद्यधुंद १५ जणांकडून दोन घरांवर सशस्त्र हल्ला, एक तरुण जखमी, कनानगरातील घटनेची शाहूपुरी पोलिसात नोंद.

टिप्पण्या