10 कोटी 94 लाख निव्वळ नफ्यासह 99.82% वसुली आणि 18.81% व्यवसाय वृद्धी, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा सातत्य आणि प्रमाणबद्ध दर्शक रिझल्ट: ॲड. दिपक पटवर्धन
रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा 10 कोटी 94 लाखांचा निव्वळ नफा, 99.82% इतकी विक्रमी वसुली यासह 2025/26 या आर्थिक वर्षात पतसंस्थेने 18.81% व्यवसाय वृद्धी नोंदवली आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने 35 वर्षात सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धी करत उत्तम आर्थिक सौष्ठव राखले असल्याने संस्थेची विश्वासार्हता जनमानसाच्यां मनावर कोरली गेली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांनी केले आहे.
सन 2025/26 या आर्थिक वर्षात संस्थेने ठेवी रुपये 408 कोटी 88 लाख तर कर्ज 302 कोटी 65 लाख यासह 711 कोटींचा संमिश्र व्यवसाय केला असून संस्थेने 169 कोटी 29 लाखांच्या बँक गुंतवणूका केल्या आहेत. गुंतवणुकांमध्ये गतवर्षीपेक्षा 13.36 टक्के वाढ नोंदवली आहे. ठेवींमध्ये रुपये 62 कोटींची वाढ झाली असून ठेवींमध्ये 18% वाढ नोंदवत ठेवी 408 कोटी 88 लाखाच्या घरात पोहोचल्या आहेत. तर संस्थेच्या कर्जामध्ये 50 कोटींची वाढ झाली असून कर्ज वितरणात लक्षणीय 19.79% ची वाढ नोंदवली आहे. या सर्वांमुळे संस्थेचे वार्षिक उत्पन्न रुपये 48 कोटी पर्यंत पोहोचले असून उत्तम व्यवस्थापन व उपलब्ध निधीचा योग्य विनियोग केल्याने उत्तम नफा प्राप्त केला आहे.
संस्थेने प्राप्त केलेल्या नफ्याचा विनीयोग संस्थेने स्व निधी वाढवण्यासाठी केला आहे. झालेल्या नफ्यातून अत्यावश्यक खर्च करून उर्वरित म्हणजे 50% पेक्षा जास्त नफा स्व निधी वाढवण्यासाठी संस्थेने गुंतवून स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक पाया भक्कम केला. पतसंस्थेच्या स्व निधी रुपये 50 कोटी झाला आहे. याव्यतिरिक्त गेल्या 35 वर्षात सर्वसाधारणतः 26000 चौरस फुटाच्या प्रॉपर्टी, 10 कार्यालये संस्थेने स्वामालकीच्या खरेदी केले आहेत.
नवीन आर्थिक वर्षात 500 कोटींचा ठेव टप्पा खुणावतोय. सन 2026/27 या आर्थिक वर्षात स्वामालकीच्या प्रशस्त 4 मजली इमारतीत नवी शाखा आणि प्रधान कार्यालय शानदारपणे प्रस्थापित करणे ही उद्दिष्टे ठेवली आहेत.
सर्वांच्या सहकार्याने रचनात्मक सहयोगाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्था विश्वासार्हतेचा मार्ग, शिस्त, सचोटी, उत्तम ग्राहक सेवा या संस्कारांच्या बळावर आपले अर्थकारण अधिक विस्तारित नेईल असा विश्वास देतो. असे सांगत सर्व सहकार्य करणारे कर्जदार, ठेवीदार, सभासद, खात्याचे अधिकारी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया ॲड. दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा