मुख्य सामग्रीवर वगळा
आजचे बातमी पत्र
- आज हसुर चंपूयेथे तालुका गड हिंगलज येथे माननीय राजेश पाटील साहेब व माननीय सभापती प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते घंटागाडी व सुका कचरा व ओला कचरा यांचे बकेट व एनसीएमसी एसटी महामंडळाचे कार्ड वाटप करण्याचा सोहळा संपन्न झाला तसेच भक्तनिवास लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रतिष्ठित प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सचिन शेंडगे यांनी केले. अखेर पावसाची दमदार हजेरी: अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात आणि अनेक रस्त्यांवर साचलं पाणी, एक जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार.
- सोशल मीडिया व्हिडिओवरून वाद: रविकिरण इंगवले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ एडीटेड आणि व्हॉईस डबिंगचा, त्या व्हिडिओमागे आमदार सतेज पाटील यांचं षडयंत्र; आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा.
- गोकुळ दूध संघ निवडणूक: ठरावाच्या संख्येवर कुणीही जाऊ नका, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती एकत्रच; नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचा खुलासा. सोमवारी भाजपच्यावतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दाखल होणार ठराव.
- कोल्हापुरात इमारत कोसळली: भिंतीत उगवलेलं झाड हटवताना कोल्हापुरातील गंजी गल्लीतील जुनी इमारत कोसळली, तर शेजारच्या इमारतीलाही गेले तडे; महापालिकेकडून दोन्ही इमारती उतरवून घेण्याची नोटीस.
- पल्स पोलिओ लसीकरण: पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात उदंड प्रतिसाद, कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लसीकरणाला सुरुवात.
- यूपीएससी टॉपर्स टॉक: यूपीएससी म्हणजे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि संयमाची परीक्षा; विद्या प्रबोधिनीमध्ये झाला आयएएस टॉपर्स टॉक कार्यक्रम.
- राम मंदिर भ्रष्टाचार प्रकरण: राम मंदिरातील भ्रष्टाचाऱ्यांबाबत योग्य न्याय होईल; विश्व हिंदू परिषदेचे विभागीय प्रचारक भाऊराव कुदळे यांचा विश्वास.
- सामाजिक बांधिलकी: जिल्हा आपत्ती व्यवस्थापनमध्ये दाखल झालेल्या १० तृतीयपंथीयांचा उतरवला ५० लाखांचा अपघात विमा; कन्येच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील जगताप कुटुंबाची सामाजिक बांधिलकी.
- जनगणना मोहिमेच्या अर्जामध्ये स्वतंत्र ओबीसी रकाना ठेवावा, ओबीसी सेवा संघाची मागणी
- रोनाल्डो आणि अन्य खेळाडूंचे स्टिकर्स लावून कारचं रुपडं बदललं, कोल्हापुरातील तरुणाचं असंही फुटबॉल आणि खेळाडू प्रेम
- इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्सवानिमित्त झालेल्या बैल पळवणे स्पर्धेत लहान गटात राकेश पाटील यांचा बैल प्रथम
- आषाढी एकादशी पालखी दिंडी सोहळा नियोजनासाठी झाली कोल्हापुरात बैठक
- कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कामावर फोकस करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, उद्योगपती संजय घोडावत यांचा मंत्र
- टी.ई.टी पेपर फुटी प्रकरणाचे कोल्हापुरात पडसाद, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या प्रतिकृतीवर भुसा फेकून युवा सेनेचं आंदोलन
- विश्व हिंदू परिषदेकडून जिल्हाभर व्यापक संपर्क अभियान, ४ जुलैपर्यंत संघटनात्मक नियुक्त्या पूर्ण करण्याचं आवाहन, कोल्हापूर विभागाची झाली नियोजन बैठक
- ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्यावतीनं आयोजित श्रीराम कथा-निरूपण सोहळ्याची सांगता, सप्ताहादरम्यान झालेल्या धार्मिक विधी आणि कथांचा भाविकांनी घेतला आनंद
- शस्त्राचा धाक दाखवून राजारामपुरी १३ व्या गल्लीतील दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या रविराज कसबेकर या सराईत गुन्हेगाराला राजारामपुरी पोलिसांकडून अटक. ,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा