आजच्या ठळक घडामोडी

                    बोलेरो जीप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ४३ वर्षाच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर तिघेजण जखमी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ घडली दुर्घटना
              ड्युटीवर असताना आढळला मद्यधुंद डॉक्टर, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकारामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया, डॉक्टर दिगंबर टोणपे तडकाफडकी कार्यमुक्त, चौकशीसाठी ३ सदस्यीय समिती नियुक्त, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही नोटीस

          कोल्हापुरातील जुना वाशीनाका इथल्या राज कपूर पुतळ्यासमोरच्या रंकाळा बागेत फिरतायत चक्क म्हैशी आणि भटकी कुत्री, नागरिकांमध्ये तीव्र संताप

            मूल्यांकनात वारंवार अपात्र ठरलेल्या राज्यातील १ हजार २५२ शाळा अन् ८२७ तुकड्या शासनानं ठरवल्या कायमस्वरूपी अपात्र, कोल्हापूरसह राज्यभरातील शिक्षकांमध्ये खळबळ, विनाअनुदानित शाळा कृती समितीचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

            सोने आणि चांदीच्या दरात उच्चांकी घसरण, ३० ते ३५ टक्के दर कमी झाल्यानं खरेदी करावी की नाही याबाबत खरेदीदारांमध्ये संभ्रम
             राज्यात विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ७१ लाख लाभार्थी महिला अपात्र, विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकास्त्र
            * रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब न हटवता निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं काम सुरु, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
         *. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडयाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळं मंदिर आणि मंदिर परिसरातील प्राचीन मूर्तीच्या सौंदर्याला मिळाली झळाळी.
  • कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीनं, आदर्श शिक्षक आणि विशेष शिक्षक पुरस्कारांचं झालं वितरण
  • बिंदू चौकातील पार्किंगमध्ये ड्रेनेजचं मैलायुक्त पाणी वाहत असल्यानं श्री अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांतून तीव्र नाराजी

  • प्रज्ञाशोध परीक्षेप्रमाणंच कागल तालुक्यानं पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल यावं, तसंच पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी कष्ट घ्यावेत, नामदार हसन मुश्रीफ यांचं आवाहन
  • कोल्हापुरातील खण विहार मित्रमंडळाच्यावतीनं झाला पुरस्कार वितरण सोहळा
  • लिंबू महागला, दर झाले जवळपास दुप्पट, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्यानं दरात मोठी वाढ, सरबत विक्रेत्यापासून हॉटेल मालकांपर्यंत सर्वच घटकांना फटका

  • ज्ञान संपादन करुन मातंग समाजानं मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश मोरे यांचं आवाहन
  • कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न, नियमात राहून काम करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले होणं चुकीचं, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश टी. व्ही. नलवडे यांचं मत
  • अक्षर अक्षर तुझेच आहे.... या कविता, कथा आणि काव्यरचनेच्या अनोख्या मैफिलीनं जिंकली करवीरकर रसिकांची मनं
  • गेल्या ३ दिवसात दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतलं श्री अंबाबाई देवीचं दर्शन, सलग सुट्टीची साधली पर्वणी.

टिप्पण्या