वाडीखुर्द एमआयडीसी प्रकल्पाचे पुढे काय झाले? नुसतीच नोटीफीकेशन की खरोखरच कुठला उद्योग येणार आहे?, बारसू रिफायनरी प्रकल्प कागदावरून सुद्धा रद्द झाला आहे का?
राजापूर तालुक्यातील वाडी खुर्द एम आय डी सी प्रस्तावित असून त्याची नोटिफिकेशन काढून जवळपास एक वर्ष होत आले तरी अद्याप या प्रकल्पाबाबत कोणतीही उचित कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नुसतीच नोटिफिकेशन आहे की खरोखरच कुठला उद्योग येणार आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
राजापूर प्रांत कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील राजवाडी, आडिवरे परिसरातील वाडी खुर्द कातळी पड जमिनीवर एम आय डी सी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आली होती. आणि भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने सर्व जमीन मालकांना प्राथमिक नोटीसा सुद्धा देण्यात आल्या होत्या. मात्र या एम आय डी सी साठी काही जमीन मालकांनी विरोध केला होता.
मात्र असे असले तरी देखील त्यावेळेस शासनाकडून हा एम आय डी सी प्रकल्प रद्द झाल्याची कोठलीही घोषणा करण्यात आलेला नाही. तसेच कोणता उद्योग येणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र असे जरी असले तरी देखील आज पर्यंत वाडी खुर्द एम आय डी सी साठी भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही.
त्यामुळे राजापूर तालुक्यात नेमके कुठले उद्योग येणार आहे की नाहीत, बरसू प्रकल्पाला जनतेने तीव्र विरोध केला होता. धोपेश्वर, गोवळ, शिवणे खुर्द, सोलगाव, देवाचे गोठणे या भागातील जनतेने रिफायनरी प्रकल्प कागदावरून सुद्धा रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असे ग्रामस्थांचे अजूनही म्हणणे आहे. धोपेश्वर, गोवळ, शिवणे खुर्द, सोलगाव, देवाचे गोठणे परिसरातील लोक कुठल्या प्रकल्पाला जमिनी देतील की नाही देतील याबाबत साशंकता अजूनही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वाडी खुर्द एम आय डी सी प्रकल्प कार्यान्वित होणार की तोही प्रकल्प बारगळणार असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा