भारतीय जनता पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा

पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्र प्रथम या तत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली, आमचा पक्ष नेहमीच समाजसेवेत अग्रेसर राहिला आहे. आमचे कार्यकर्ते त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी, अढळ निष्ठेसाठी आणि सुशासनाप्रती असलेल्या तीव्र तळमळीसाठी ओळखले जातात. त्यांनी तळागाळात अथक परिश्रम घेऊन, जास्तीत जास्त लोकांना आमच्या विचारधारेशी आणि कार्याशी जोडले जाईल याची खात्री केली आहे. आम्ही त्या असंख्य कार्यकर्त्यांचेही स्मरण करतो, ज्यांच्या समर्पण, त्याग आणि चिकाटीने अनेक दशकांपासून पक्षाच्या विकासाला आकार दिला आहे.

भाजप हा एक असा पक्ष आहे जो लोकांच्या कल्याणाला आपल्या दूरदृष्टीच्या केंद्रस्थानी ठेवतो. हे आमच्या केंद्र आणि विविध राज्यांमधील कामातून दिसून येते.

भाजप 'विकसित भारत' घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आपला सामूहिक निर्धार ही दूरदृष्टी पुढे नेत राहो आणि भारताला प्रगती व समृद्धीच्या नव्या उंचीवर घेऊन जावो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भाजप पक्ष स्थापनेबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या