आजच्या दिवसभरातील घडामोडी

.         पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रूपयांचं विमा संरक्षण मिळावं, सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामं पतसंस्थांना मिळावीत यासाठी पाठपुरावा करू, कोल्हापुरात झालेल्या पतसंस्था फेडरेशनच्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
            राज्य पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड, तर सहकाररत्न पुरस्कारानं खासदार धनंजय महाडिक यांचा गौरव

दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळं जयंती नाल्यातील कचरा गेला पंचगंगा नदीत, राजाराम बंधाऱ्याजवळ साचलाय शेकडो टन कचऱ्याचा खच, पाणी प्रदूषणाच्या तीव्रतेमुळं माशांचा मृत्यू

कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील चप्पल दुकानाला शॉर्ट सर्किटनं आगं, सुमारे २० लाखांचं नुकसान

श्री अंबाबाई मंदिरातील गरूड मंडप उभारणीचं काम गेले दीड महिना ठप्प, किरणोत्सव यशस्वी होण्यासाठी मंडपाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावामुळं काम थांबलं
            अंबा मातेच्या जयघोषात आणि चैतन्यदायी वातावरणात पार पडला करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव, नयनरम्य आतषबाजी, रंगावली आणि फुलांच्या पायघड्यांनी सजला नगरप्रदक्षिणेचा मार्ग
रस्त्यावरील भलं मोठं वडाचं झाड तोडण्याच्या कारणावरून मजरेवाडी आणि बस्तवाड ग्रामस्थांमध्ये वाद, सोमवारी होणाऱ्या निर्णयाकडं ग्रामस्थांचं लक्ष
        जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेली प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच, जोतिबा डोंगरावर झाला बंदी असलेल्या कॅरिबॅगचा सर्रास वापर
        गुडफ्रायडे निमित्त ख्रिश्चन एकता मंचच्यावतीनं झालं गरजू संस्था आणि व्यक्तींना अन्नधान्य आणि कपडयांचं वाटप.                                                            कागलच्या राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची विक्रमी भरारी, ९४३ कोटी रुपयांचा व्यवसाय, तर ७ कोटी ४२ लाख रुपयांचा ढोबळ नफा, अध्यक्षा नवोदिता घाटगे यांची माहिती
          कवी प्रा. डॉ. सुर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात झालं विविध साहित्यकृतींचं पुनर्प्रकाशन, खांडेकरांच्या स्मृतींना मिळाला उजाळा
       हिंदू नववर्ष, श्री रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरातील स्वरसांगाती संस्थेच्यावतीनं झाला गीत रामायणाचा कार्यक्रम

कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीनं, आदर्श शिक्षक आणि विशेष शिक्षक पुरस्कारांचं झालं वितरण
       स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्त कोल्हापुरात झाली कार्यशाळा, ऑटीझमग्रस्त मुलं आत्मविश्वासानं वावरतील यासाठी समाजाचं पाठबळ आवश्यक, डॉ. इव्हीव्ही राजशेखर यांचं आवाहन

महिलांसाठी स्वतंत्र सहकार संचालनालय निर्माण करावं, नव्या संस्थेची नोंदणी करताना ५० टक्के महिलांचा सहभाग बंधनकारक असावा, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या महिला मेळाव्यातील विविध मागण्या

आर्थिक परिस्थितीपेक्षा अशा व्यक्तींना अर्थसाह्य करुन त्यांना व्यवसायाभिमुख बनवत त्यांची पत निर्माण करण्याचं काम पतसंस्थांनी करावं, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील

टिप्पण्या