देवरुख शहराच्या पाणी योजनेला मिळणार लवकरच मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संबंधित विभागाला लेखी निर्देश

देवरुख शहराच्या पाणी योजनेला मिळणार लवकरच मंजुरी 

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले संबंधित विभागाला लेखी निर्देश

देवरुख नगराध्यक्षा सौ मृणाल शेट्ये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या घेतलेल्या भेटीची फलश्रुती

देवरुख नगराध्यक्षा सौ मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी श्री प्रशांत भोसले, पाणी सभापती यशवंत गोपाळ, प्रफुल भुवड, अभिजीत शेट्ये यांनी देवरुख शहरासाठी प्रस्तावित असलेल्या पाणी योजनेला आर्थिक तरतुदीसह मंजुरी मिळावी या उद्देशाने भाजपा प्रदेशाध्यक्ष मा श्री रविंद्रजी चव्हाण साहेब याची भेट मुंबई येथे नुकतीच घेतली होती. या भेटीत २०२४ साला पासून प्रलंबित असलेल्या देवरुखच्या पाणी योजनेला मंजुरी मिळवून द्यावी अशी विनंती रविंद्रजी चव्हाण साहेब यांना केली होती. त्यानंतर तत्काळ रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेत. देवरुख शहराच्या पाणी योजनेस विशेष बाब म्हणून मंजूरी द्यावी अशी लेखी विनंती केली. या पत्रावर मुख्यमंत्री महोदयांनी आपली मोहर उमटवत संबंधीत अधिकाऱ्यांना लिखित निर्देश दिले आहेत.
स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या या लेखी निर्देशामुळे देवरुख शहराच्या पाणी योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्पूर्वी देवरुख शहराच्या पाणी योजनेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, पालक मंत्री उदयजी सामंत साहेब यांचे सहकार्य घेत आमदार शेखरजी निकम साहेब यांनी अथक प्रयत्न करत विधानसभा निवडणुकी पूर्वी ८/१०/२०२४ रोजी सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान अंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची मान्यता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मंजुरी मिळवली होती. आता त्या योजनेला आर्थिक तरतूद करून जीआर काढणे हा महत्वाचा टप्पा होणे बाकी होता.!मुख्यमंत्री साहेबांच्या लिखित निर्देशामुळे हा महत्वाचा टप्पा देखील यशस्वीरित्या पार पडणार असून योजना मंजूर झाल्याची बातमी देवरुख वसियाना मिळणार आहे.

टिप्पण्या