आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक रवि भांदककार यांना "डॉक्टरेट" घोषित
आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक रवि भांदककार यांना "डॉक्टरेट" घोषित
जागतीक मास्टर्स कराटे विजेते मास्टर सेन्साई रवि भांदककार यांना नूकत्याच 30 मार्च 2026 रोजी नागपुर येथे झालेल्या युनाईटेड युनिवर्सिटी अमेरीका द्वारे अंतिम सब्जेक्ट सबमिशन व व्हेरीफिकेशन काॅन्सर्न मध्ये यश प्राप्त करुन गत सात वर्षापासुन त्याच्यां सुरु असलेल्या आतंरराष्ट्रीय मार्शल आर्ट तथा फिजिओथेरोपी या विषयाला घेऊन अभ्यास सुरु होता. त्यांचे आतंरराष्ट्रीय मार्गदर्शक मान.डाॅक्टर शिवकुमार रामलिगंम अँकेडमीक बोर्ड मेबंर यु.ए.यु द्वारा अंतिम कार्न्सन युनाईटेड युनिवर्सिटी अमेरीका टिम द्वारे सुनिश्चित करुन कन्फर्मेशन लेटर व्दारे जाहीर करण्यात आला.
जो 25 एप्रील 2026 रोजी दिल्ली येथे आतंरराष्ट्रीय विद्यापीठ दिक्षातं समारोहात प्रदान करण्यात येणार आहे .
मास्टर सेन्साई रवि भांदककार यांनी मार्शलआर्ट कराटे जिवनाची सुरुवात वयाच्या 12 व्या वर्षापासुन सुरु केली त्यांचे प्रथम गूरु स्व.सेन्साई विशाल ऊर्फ प्रदिप वाळके,त्यानतंर त्याचे विदर्भ महाराष्ट्राचे चिफ सेन्साई अरविदं पाटील, राष्ट्रीय मूष्ठीयोध्या,व राष्ट्रीय प्रमुख एच.आर.एच.ईडोंनेशिया,ग्रँन्डमास्टर एम.ए.अली,कोलकत्ता पश्चीम बंगाल तथा आतंरराष्ट्रीय मार्गदर्शक ग्रँन्डमास्टर डाॅ.शिवकुमार रामलिंगम बोर्ड आँफ अथोरीटीज अँन्ड टिकेडी वर्ल्डचिफ अहमदाबाद गुजरात या प्रमुखाच्या मार्गदर्शनात हे यश प्राप्त केले.
मास्टर सेन्साई रवि भांदककार यानां आजतायागत अनेक राज्य ते जागतीक स्तरापर्यतंचे पुरस्कार प्राप्त केले. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय,आतंरराष्ट्रीय हाॅलआँफ फेम स्पोर्टस अँथोरीटी आँफ ईडींया,भारतीय खेलरत्न,जागतीक मास्टर्स कराटे विजेता थायलंड बँकाॅक चा बहुमान,ब्रन्डअँम्बेसिटर न.प ( महाराष्ट्र शासन ) व आत्ता अतिउच्च आतंरराष्ट्रीय मानदपदवि पुरस्कार ( डाॅक्ट्रेट ) असा खडतर प्रवास त्यांंनी जिवनात केला.
त्यांनी आजतागायत 35 हजार वर विध्यार्थ्यानां प्रशिक्षीत करुन घडविले. ज्यात अनेक विध्यार्थी बि.एस.एफ,आर्मी,कंमाडो,पोलीस,फाॅरेस्ट तथा सिक्युरीटी सुरक्षागार्ड आदी क्षेत्रात नौकरी करुन ऊपजिवीका करतात व अनेकाचे ते आदर्श आहेत. सध्या ते आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमीक तथा ऊच्च माध्यमीक आश्रम शाळा जिमलगट्टा येथे क्रीडामार्गदर्शक तथा क्रीडाशिक्षक म्हणुन कर्तव्यदक्ष आहे. तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अतंर्गत सहा.प्रकल्प क्रीडा समन्वयक म्हणुन कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे सर्व गूरुमार्गदर्शक ,मित्रपरीवारण व आपल्या परीवारातील सर्व कुटुंबाला दिले. त्याची खंदेसमर्थक जिवसंगीनी सौ.किरण रवि भांदककार यांना दिले त्यांनी अर्धागीनी म्हणुन मित्र म्हणुन सदैव सहकारी म्हणुन पाठीशी खंबीर ऊभ्या होत्या मास्टर सेन्साई रवि भांदककार यांच्या देशअभिमान कार्यावर तथा दैदिप्यमान यशावर सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा