आजची बातमी पत्र

  • कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्वीकारला पदभार, प्रशासन आणि नगरसेवक यांच्या समन्वयातून शहराचा सुनियोजित विकास करण्यावर भर, डॉ. भारुड यांची ग्वाही
  • स्कायमेटनं वर्तवला यंदाच्या मान्सूनबद्दल पहिला अंदाज, देशात सरासरीपेक्षा ९४ टक्के पाऊस पडणार असल्यानं कृषी उत्पादन आणि जलसंपत्तीबाबत व्यक्त केली चिंता
  • इचलकरंजीतील जलशुद्धीकरण केंद्रातून हजारो लिटर पाणी थेट गटारीत, पाण्याचा अपव्यय आणि जमीनीत मुरणाऱ्या पाण्यामुळं जुन्या इमारतींना धोका
  • जागतिक युध्दाच्या परिस्थितीतही भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी वधारला, सेन्सेक्स ५०९ अंकांनी वाढून ७४ हजार ६१६ वर, तर १५५ अंकांनी वाढलेला निफ्टी २३ हजार १२३ वर
  • महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना होणार, ३२ हजार ६७९ कोटी रूपये कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे येणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
  • आपत्ती व्यवस्थापन विभागात खाजगी भांडवलाच्या आधारे वित्त पुरवठा होणार, जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या १६५ कोटी रुपयांचा निधीचा वापर पुराचा धोका कमी करण्यासाठी होणार
  • चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक, सव्वा पाच लाखाच्या १२ दुचाकी जप्त
  • हमाल, माथाडी कामगारांनी आडमुठी भूमिका घेतल्यानं मार्केट कमिटीमधील गूळ सौदे थांबले, गूळ उत्पादक शेतकरी संतप्त
  • पंचगंगा नदीचं प्रदुषण रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटना आक्रमक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाली शाब्दीक चकमक.मध्ये शोधा

    • भगवान महावीर जयंतीचं औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीनं ९ एप्रिलला कोल्हापुरात नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचं आयोजन
    • शिवछत्रपतींपासून राजर्षी शाहूंपर्यंत मराठे शाहीचा अतिशय सखोल अभ्यास आणि अचुक संशोधन करणाऱ्या डॉ. जयसिंगराव पवारांबद्दल पुढील पिढया नेहमी कृतज्ञ राहतील, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचं प्रतिपादन
    • शैक्षणिक सहलीसाठी बहुसंख्य शाळांनी लालपरीला प्राधान्य दिल्यानं कोल्हापूर एस. टी. आगाराला मिळालं साडेतीन कोटी रुपयांचं उत्पन्न
    • कागलमधील कचरा डेपो परिसरात घरफोडी, बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एक लाखाचा ऐवज केला लंपास
    • कोल्हापुरातील कामाचा अनुभव भविष्यात उपयोगी ठरेल, महापालिकेच्या मावळत्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचा झाला निरोप समारंभ
    • कोल्हापूर महापालिकेच्या तिसऱ्या सुधारित विकास योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, मुलभूत नागरी सुविधांचा प्राधान्यानं विचार व्हावा, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
    • स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतीबा फुले यांची द्विजन्म शताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, ११ एप्रिल रोजी निघणार भव्य अभिवादन दिंडी
    • कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत सुरू झालीय अतिक्रमण निर्मुलन मोहिम, ६० टपऱ्या, सहा कारखान्यांचं पार्किंग शेड आणि एक एटीएम केबीन हटवली
    • रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढल्यानं सामाजिक आणि कौटुंबिक रचनेवर परिणाम, आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य आहारविहारासह संगीत थेरपी उपयुक्त, डॉ. संदीप पाटील यांचं मत
    • दाम दुप्पटीचं अमिष दाखवून तीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सहाजणांना अटक, १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
    • कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या रेणुका नगरातील २३ वर्षीय हॉकीपटू शिवम पाटीलनं केल गळफास घेवून आत्महत्या.

टिप्पण्या