आज चे बातमी पत्र

  • भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापनदिन साजरा, सन २०४७ पर्यंत देशाला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करूया, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं आवाहन
  • शासनाच्या सर्व योजना जिल्हयाच्या दुर्गम भागात पोहचवू, नागरिकांची कामं ग्रामपंचायत स्तरावर होण्यासाठी प्रयत्नशील राहू, जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मीन यांची ग्वाही

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन
  • दिवसाची सुरवात घरसरणीनं, दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी, सेन्सेक्स ७८७ अंकांनी वाढून ७४ हजार १०६ वर, तर निफ्टीनं पार केला २२ हजार ९५० चा टप्पा

  • कोल्हापूर शहरातील अतिक्रमण काढताना कोणताही लोकप्रतिनिधी आडवा येणार नाही, महापौर रुपाराणी निकम यांची जनता दरबारात ग्वाही
  • आमदार अशोकराव माने यांच्या हुपरी नगरपालिकेतील आढावा बैठकीकडं सत्ताधारी नगरसेवकांची पाठ, ४६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना-अधिकारी आणि ठेकेदारांची मनमानी यासह अनेक विषयावर जोरदार वादावादी
  • सर्वोच्च न्यायालयानं अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मंजूर केलेली ग्रॅच्युईटी आणि मे महिन्याची सुट्टी मिळावी, जिल्हा परिषदेवर निघाला सेविकांचा मोर्चा
  • सातत्यानं गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करावी, शिवसेना उबाठा गटाची मागणी


  • गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीत पीएनजी जागरूकता कार्यशाळा उत्साहात संपन्न, उद्योगांसाठी स्वच्छ ऊर्जेकडं मोठं पाऊल
  • गुंडगिरी आणि सावकारी करून रिक्षा व्यावसायिकांना मारहाण करणाऱ्या रिक्षाचालक अमोल खर्जे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पोलिसांकडून पाठराखण, कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा रिक्षा संघटनांचा इशारा

  • रंगकर्मी स्वर्गीय सुविद्य कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झाले प्रायोगिक नाटकांचे प्रयोग
  • अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, भोंदूबाबा अशोक खरातसह त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी


  • कोल्हापूर महापालिकेच्या टाकाळा विद्यामंदिर प्राथमिक शाळेची शैक्षणिक क्षेत्रात दमदार वाटचाल, गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळं शाळेला मिळाले विविध पुरस्कार
  • सन २०२७ मध्ये देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार, महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
  • बारामती आणि राहुरी विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा
  • केडीसीसी बँक आणि विकास सेवा संस्थाद्वारे झालेल्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करावी, या मागणीसाठी आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
  • अवनी आणि एकटी संस्थेच्यावतीनं ७ एप्रिल रोजी कोल्हापुरात पुनर्चक्रीकरणाची भिंत उपक्रम
  • गॅस दर वाढ, सिलेंडर टंचाई आणि काळा बाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
  • कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्यावतीनं ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार केडीएल प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा.

टिप्पण्या