बातमीपत्र
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोन आठवडयांसाठी युध्द विरामाची घोषणा, भारतासह अनेक देशांमध्ये सकारात्मक पडसाद, युध्द समाप्तीची आशा वाढली
- मध्यपुर्वेतील युध्द विरामाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजीचा वारू, २ हजार ९४६ अंकांनी उसळी घेऊन सेन्सेक्स ७७ हजार ५६२ वर, तर निफ्टीमध्ये ८३७ अंकांची वाढ
- राधानगरी तालुक्यातील मानेवाडी इथल्या अंगणवाडीत गॅस सिलेंडरचा भडका, सेविका आणि मदतनीसाच्या जागरूकतेमुळं १० बालकं बचावली
- अखेर समरजितसिंह घाटगेंचा मुंबईत झाला भाजप प्रवेश, पक्षाची विचारधारा गावोगावी पोहचवून संघटनात्मक ताकद वाढवा, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं आवाहन
- आसाममधील कामगाराचा कागलमधील जयसिंगराव तलाव परिसरातील चरीत पडून मृत्यू, धोकादायक चर तातडीनं मुजवण्याची गरज
- गोकुळशी संबंधित ४ याचिकांवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली सुनावणी, अवसायानात काढलेल्या १ हजार २०० दूध संस्थांबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शासनाला २१ एप्रिलपर्यंत मुदत
- चटणीनं आणलं डोळ्यात पाणी, मिरच्यांचे भाव वाढल्यानं चटणीच्या दरात वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं
- इचलकरंजीतील शंभुतीर्थाचं उद्घाटन होऊन ४ महिने उलटले तरी ठेकेदाराचं बिल थकीत
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे विविध उपक्रम उत्साहानं व्हावेत, मात्र कायद्याचं पालन करावं, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली पोलिस उपाधीक्षकांची बैठक
- हुपरी इथं चांदीचे दागिने देण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, सांगली जिल्ह्यातील घोटी बुद्रुक गावातील शिवम जाधव असं व्यापाऱ्याचं नाव. जुगार खेळणाऱ्या ३४ जणांवर इचलकरंजीत कारवाई, ५ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्तकोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, १२ एप्रिलला होणार पुरस्कार वितरणजितो प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत अन्वीत वॉरियर्स संघानं पटकावलं विजेतेपद, तर सिल्वो स्टाईल सिल्व्हर हॉक संघ उपविजेतासामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीनं ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचं आयोजनकोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांकडील ३२० कोटी रुपयांची थकित देणी त्वरित मिळावीत, शेतकरी संघटनांचं साखर सहसंचालकांना साकडंगेली ४ वर्ष रखडलेल्या दिव्यांग भवनाचं काम तातडीनं सुरू करावं, या आणि अन्य मागण्यांसाठी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्यावतीनं महापालिकेसमोर झाली निदर्शनंकोल्हापूर जिल्हयातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवातअखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडीच्यावतीनं १२ एप्रिलला होणार ब्राह्मण शेतकरी मेळावा, शेतीमधील नवतंत्रज्ञानाची मिळणार माहितीरेंदाळमधील बेघरांचा इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चासोने साडेतीन हजारानं आणि चांदी अकरा हजारानं वाढली, युध्दविरामाचा सराफ बाजारावरही परिणाम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा