कै. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कै. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कै. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अनेक पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते.
            कार्यक्रमात उपस्थित शेखर लेले सर यांनी कुसुमताई अभ्यंकर यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि समाजकार्यातील योगदानाचा गौरव केला. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांचे अनुभव कथन केले.
            यावेळी *सुनीता पाटणकर* यांनीही कुसुमताईंच्या सहवासातील आठवणी सांगत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कार्यतत्परता आणि जनसामान्यांशी असलेला जिव्हाळा यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे शहराध्यक्ष दादा ढेकणे पदवीधर सेलचे मनोज पाटणकर माजी शहराध्यक्ष राजन फाळके शेखर लेले महिला शहराध्यक्ष भक्ती दळी,अशोक वाडेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश आखाडे यांनी केले.
            कार्यक्रमाचे वातावरण कृतज्ञता आणि आदराने भारलेले होते. उपस्थितांनी कुसुमताई अभ्यंकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या