वेलगूर परिसरात अनियमित व कमी दाबाच्या विजेने उपकरणे निकामी, व्यवसाय ठप्प समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची निवेदन व कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा

वेलगूर परिसरात अनियमित व कमी दाबाच्या विजेने उपकरणे निकामी, व्यवसाय ठप्प समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची निवेदन व कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा 

BY- दिपक चुनारकर 

 मागे दोन महिन्यापासून वेलगुर परिसरातील वेलगूर,नवेगाव,बोटलाचेरू, किष्टापूर, सज्जनपूर,चंदनपुर, बाळापूर,शंकरपूर,मैलाराम,वेलगुर टोला या गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून त्याचबरोबर कमी दाबाच्या वीज पुरवठाने अनेक नागरिकांचे टीव्ही पाण्याचे मोटर फ्रिज लहान आटा चक्की निकामी झाले. पिठाची गिरणी भात गिरणी पंचर दुरुस्ती थंड पेय दुकान बंद असून त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. वेलगूर परिसरात वीज ही मुलचेरा उपकेंद्रातून येत असून ही समस्या सोडवण्यासाठी अनेकदा सांगण्यात आले तरी पण आतापर्यंत ही समस्या सुटली नाही त्याकरिता वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहुर्ले, रोहित गलबले (सदस्य ग्रा. प) दीपक चुनारकर (सामाजिक कार्यकर्ता,) विश्वनाथ झाडे, मुक्तेश्वर गदेकर, देवानंद गदेकर विनायक बोरुले,रवी बोरुले, प्रभाकर गुरनुले ह्या शिष्टमंडळांनी कार्यकारी अभियंता यांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. प्रमुख मागण्या. वेलगूर परिसरातील वीज पुरवठा अल्लापल्लीवरून करावे, कमी दाबाची समस्या सोडवावी, वीज पुरवठा 24 तास सुरळीत करण्यात यावा रीडिंग करूनच वीज बिल पाठवण्यात यावे एक अतिरिक्त लाईनमन द्यावे, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त फिडर बसवण्यात यावे, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून ती समस्या कायमस्वरूपी सोडवावी या मागण्या करण्यात आल्या, सात दिवसात समस्या सोडवणं सोडविण्यात न आल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

टिप्पण्या