आजचे बातमी पत्र
चांगभलंच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत दख्खनचा राजा जोतिबाची रंगली चैत्र यात्रा, पाऊस आणि भक्तीरसात भिजले सुमारे ८ लाख भाविक
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाचा तडाखा, काही ठिकाणी झाली गारपीट, अनेक रस्त्यांची अवस्था ओढ्या-नाल्यासारखी, पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे
१ कोटी ६४ लाख रुपये किंमतीचं गोवा बनावटीचं मद्य आणि ट्रक असा एकूण १ कोटी ७९ लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची शाहूवाडीमधील कारवाई
महिन्याभरात कोसळलेला भारतीय शेअर बाजार काहीसा सावरला, १ हजार १८७ अंकांची भरारी घेऊन सेन्सेक्स ७३ हजार १३२ वर, तर ३४८ अंकांची वाढ घेऊन निफ्टी २२ हजार ६७९ वर
कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील पॅकेजिंग कारखान्यात भीषण अपघात, मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
पेठवडगावमधील स्थानिक राजकारणाला उकळी, खोट्या तक्रारी विरोधात यादव आघाडीनं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, पेठवडगावमध्ये काढण्यात आला मूक मोर्चा
श्री सिद्धगिरी मठावर भरलाय देशभरातील कारागिरांचा महाकुंभ, हस्तकलेसह चित्रकला-दागिने-कपडे-साड्या विक्रीला चांगला प्रतिसाद, आवर्जून पाहण्यासारखा कारागीर मेळा
मोठा गाजावाजा करून अंबाबाई मंदिर परिसरात उभारलेले संगीत खांब बंद पडल्यानं आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी, तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात त्रुटी खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा
जोतिबा डोंगरावर दक्षिण दरवाजाच्या बाजूला झाडावर वीज कोसळली
सोसाट्याच्या वाऱ्यामुळं पिंपळाच्या झाडाची भली मोठी फांदी कोसळून चारचाकी वाहनं आणि केबिनचं नुकसान, पंचगंगा नदी घाटावर दोन भाविक किरकोळ जखमी.
- गोकुळ दूध संघाच्या चौकशीसाठी सहकार विभागाकडून द्विसदस्यीय समिती स्थापन, संचालक मंडळात खळबळ
- ३ ते ५ एप्रिल या कालावधीत कोल्हापुरातील चिन्मय सेवा ट्रस्टच्यावतीनं होणार स्वामी अभेदानंद यांचं व्याख्यान
- जोतिबा यात्रेच्या निमित्तानं भक्तीला सामाजिक भावनेची जोड, अनेक सेवाभावी उपक्रमातून कोल्हापूरचं दातृत्व कायम
- आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ, हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
- कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या लेखापरीक्षणाची सहकार निबंधकांनी व्याप्ती वाढवली, शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश
- अवसायानात काढलेल्या १ हजार पेक्षा अधिक दूध संस्थांना गोकुळच्या मतदानापासून वंचित ठेवू नये, मनसेची मागणी
- बिद्रीतील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात ११ आरोपी न्यायालयीन कोठडीत, मुख्य सूत्रधार अद्याप फरारच
- इचलकरंजीतील डीकेटीईमध्ये झाली सीसीडब्ल्युसी आंतरराष्ट्रीय परिषद, अमेरिका आणि चीनसह देश-विदेशातील संशोधकांचा सहभाग. स्थानिक चॅनेलच्याकडून झालं जोतिबा यात्रेचं थेट प्रक्षेपण, लाखो प्रेक्षकांनी घरबसल्या घेतला डोंगरावरील विविध कार्यक्रमांचा आनंद
- पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दुचाकीची तोडफोड, शहापूर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा