थोर समाजवादी नेते स्व एस एम जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या एस एम जोशी यांच्या पुतळ्याला अभिवादन

थोर समाजवादी नेते स्व एस एम जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या एस एम जोशी यांच्या पुतळ्याला अभिवादन

आज थोर समाजवादी नेते एस एम जोशी यांची पुण्यतिथी निमित्त रत्नागिरीतील एस एम जोशी विद्यानिकेतन शैक्षणिक परिसरातील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या एस. एम. जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गवाळे व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा सुकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये एस. एम. जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेतला. त्यांनी एस. एम. जोशी यांचे नाव आपल्या शैक्षणिक संकुलाला असून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याविषयी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रा पौर्णिमा सरदेसाई यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केल्या नंतर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांस महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या