मुख्य सामग्रीवर वगळा
बातमीपत्र
- १५२ कोटी रुपयांची थकबाकी भरली नसल्यानं महापालिकेच्या दोन पंपिंग स्टेशनला पाटबंधारे विभागानं ठोकलं सिल, तर घरफाळा आणि पाणीपट्टीचे साडेदहा कोटी रुपये थकवल्यानं महापालिकेनं जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला लावलं टाळं
- अडीच तासाच्या चर्चेनंतर पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा सुरु करण्याची तयारी, मात्र परस्पर पाणी पुरवठा बंद केल्याबद्दल महापौर आणि पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी
- लाखो भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन भक्तीभावानं साजरा, ठिकठिकाणच्या स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
- विद्युत तारेचा धक्का लागून ५५ वर्षाच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, भुदरगड तालुक्यातील निळपणमधील दुर्दैवी घटना
- जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचं काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावं, खासदार धनंजय महाडिक यांची सूचना
- कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील सकाळ-संध्याकाळच्या वेळेत सुरू होणाऱ्या नव्या विमानसेवेमुळं उद्योजक आणि पर्यटकांची मोठी सोय, कोल्हापूर-अहमदाबाद हवाई सेवेला प्रारंभ
- गोरगरीबांसाठी आधार असलेल्या शिवभोजन थाळी केंद्र चालकांसमोर गॅस टंचाईचं संकट, आधीच शासनाकडून अनुदान थकीत, आता गॅस टंचाईचा फटका
- यंदाच्या उन्हाळी सुट्टीत शाळेतील शिक्षक आणि क्लार्क यांना जनगणनेच्या कामाला जुंपलं जाणार, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी .मद्य तस्करांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली नाही तर पालकमंत्र्यांना अडवणार, ठाकरे गट शिवसेनेचा उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदनाद्वारे इशारा
कौटुंबिक जबाबदारी घेतानाच महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची जपणूक करावी, सौ. अरूंधती महाडिक यांचं आवाहन
शिवाजी विद्यापीठ जवळच्या केएसबीपी उद्यानात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्मारक उभारणार, नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांचा निर्णय
महापालिकेच्या सभागृहात अपशब्द वापरणाऱ्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी, हिंदू एकताची मागणी
वादळी वाऱ्यामुळं घरावरील छप्पर उडालेल्या दऱ्याचे वडगावमधील ग्रामस्थांना आमदार अमल महाडिक यांनी दिला मदतीचा हात, स्वनिधीतून दिली मदत
केंद्र शासनाच्या उमेद उपक्रमातून नोंदणीकृत बचत गटांना मिळाला कोल्हापूर विमानतळावर स्टॉल, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांची स्टॉलला भेट
रस्त्याकडेच्या बेवारस वाहन पार्कंगमुळं इचलकरंजीत ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा, महापालिका आणि पोलिसांनी धुळखात पडलेली वाहनं जप्त करणं गरजेचं
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपालचा वेताळमाळवर आणि सम्राटनगर संघाचा मर्दानी खेळ आखाडा संघावर विजय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा