आजची ठळक वैशिष्ट्ये
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड, महायुती अभेद्य
अपघातांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा संताप, कागल सीमा तपासणी नाक्यावरील बॅरिकेटिंग हटवून महामार्ग केला खुला
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मूर्तीची राज्य पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी, मूर्तीवर नजीकच्या काळात वज्रलेपाची गरज नसल्याचा अभिप्राय
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वधारला, ५६८ अंकांनी वाढून सेन्सेक्स ७६ हजार ७० वर, तर निफ्टी निर्देशांक १७२ अंकांनी वाढून २३ हजार ५८१ वर
गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली, यंदा गुढीची काठी, साखर माळ, फुले आणि वस्त्राचे दर वाढले
सव्वा लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे या दोघांना २० मार्चपर्यंत न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी
पेट्रोल पंपावर नको तर रेशन धान्य दुकानदार आणि हॉकर्सधारक रॉकेल विक्रेत्यांनाच रॉकेल विक्रीची परवानगी मिळावी, रेशन दुकानदार आणि रॉकेल हॉकर्स विक्रेत्यांची मागणी
माती, निसर्ग, जंगल आणि रानभाज्या जपण्याची गरज, सेंद्रीय शेती आणि किचन गार्डन संकल्पना राबवणं गरजेचं, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांचं आवाहन
अन्नछत्र चालवणाऱ्या कोल्हापुरातील सर्वच सामाजिक संस्थांचा गॅस पुरवठा अखंडीत ठेवावा, सकल हिंदू समाजाची मागणी
कागल तालुक्यातील बिद्री इथं गुटखा विक्री करणाऱ्या उदय ढेकळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून अटक, १ लाख ५३ हजाराचा गुटखा जप्त. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बिंदू चौकात ईद फेस्टिव्हलला प्रारंभ, ड्रायफ्रुटसपासून कपड्यांपर्यंत विविध उत्पादनं उपलब्ध
गुरुवर्य टी. के. वडणगेकर यांच्या २६ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात गुरुशिष्य कला प्रदर्शनाला प्रारंभ
कोल्हापुरातील परिख पुलाखालून होणारी चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करावी, युथ डेव्हलपमेंट फौंडेशनची मागणी
एल पी जी गॅस दरवाढीमुळं तीन आसनी रिक्षा व्यवसाय धोक्यात, रिक्षा भाडेवाढ करण्याची मागणी
तत्वनिष्ठा इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्या असंख्य धारकऱ्यांकडून पाळला जातो बलिदान मास, नव्या पिढीमध्ये इतिहासाबद्दल आदर ठेवत देव-देश आणि धर्माबद्दल
हृदयरोगासह कोणत्याही व्याधीवर मात करण्यासाठी सकारात्मकता आणि योग्य आहार-विहार गरजेचा, आयुर्वेदात सर्वाधिक ताकद, ब्राम्हण महासंघाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात डॉ. रोहित साने यांची भूमिका
रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सची धडक बसल्यानं ३० वर्षाच्या दिव्यांग अमित लोखंडेचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातात प्रविण कटकोळे हा तरूण गंभीर जखमी, सांगली- कोल्हापूर महामार्गावर हेरले फाट्यावरील अपघात
भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्याकडून जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार, तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रूपयांचं बक्षिस, परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा