रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुती करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, कुणीही आम्हाला हलक्या घेऊ नये: मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दोन्ही जिल्ह्यात महायुती होते की कसे काय हे येत्या दोन तीन दिवसात समजेल. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद २०१९ पासून २०२४ पर्यंत वाढलेली आहे. गावागावात पक्ष पोचला आहे. भारतीय जनता पक्षाला कमी लेखता कामा नये. एक जागा देतो, दोन जागा देतो अशी भूमिका चालणार नाही. सन्मानपूर्वक जागा वाटप झाले तर आम्ही सुद्धा समाधानी असू. रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना भाजपच्याच कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे आता कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे की आमच्या स्थानिक निवडणुकीत आम्हाला सुद्धा सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. कुणी आम्हाला कमी लेखू नये. हलक्यात घेऊ नये. कुणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये. कुणाला खुमखुमी काढायची असेल, उठवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशाही कुणी आम्हाला धमक्या देऊ नयेत. कार्यकर्ते आपली भूमिका मांडत असतील तर त्याची दखल पक्ष श्रेष्ठी घेतील. अशी प्रतिक्रिया मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांकडे दिली आहे. मंत्री नितेश राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Comments
Post a Comment