रत्नागिरी शहरात सुरु असलेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कामामुळे निर्माण होत असलेल्या धुळीचा वाहतूक पोलिसांना देखील मनस्ताप, अक्षरशः नाका तोंडावर रुमाल बांधून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे
रत्नागिरी शहरांमध्ये अचानक सुरू झालेल्या डांबरी रस्त्यांच्या कामामुळे शहरात वाहतूक नियंत्रणासाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना धुळीचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांना नाका तोंडावर अक्षरशः रुमाल बांधून उभे राहून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी शहरांमध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. अशा काळातच रत्नागिरी शहरातील काही भागांमध्ये रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू झाली आहे. यासाठी रस्त्यावरती ब्लोअर मारण्यात येतो. रस्त्याचे डांबरीकरण करून झाल्यानंतर त्यावर बारीक खडी मारण्यात येते. त्यामुळे वाहतूक सुरू असताना रस्त्यावरून धूळ उडते. त्यामुळे नागरिकांना धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र रत्नागिरी शहरांमध्ये जागोजागी वाहतूक पोलीस उभे असतात. या वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत असते. मात्र डांबरीकरणाच्या या कामामुळे वाहतूक पोलिसात देखील बचावलेले नाहीत. रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतूक पोलिसांना देखील धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांना नाका तोंडावर रुमाल बांधून उभे राहून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेकडून धुळीसाठी काही उपाययोजना करण्यात येतील का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment