राजापूर नाट्य गृहाच्या उभारणीसाठी ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केले होते विशेष प्रयत्न, माजी खासदार सुरेश प्रभू, माजी विधान परिषद आमदार अनंत तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता भूमिपूजनाचा कार्यक्रम
राजापूर शहरात मागील काही वीस वर्षात अनेक भरीव अशी विकासाची कामे झाली. त्यातील एक महत्त्वाचे विकास काम म्हणजे राजापूरचे नाट्य गृह. राजापूरच्या माजी नगराध्यक्षा आणि माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी त्या काळी राजापुरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत भव्य असे नाट्य गृह उभारणीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले. राजापूर शहरात सुसज्ज नाट्यगृह व्हावे अशी सर्वांचीच मागणी होती. केंद्र सरकारच्या आय डी एस एम टी अंतर्गत सन २००० मध्ये सुमारे एक कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. त्यामध्ये व्यापारी गाळे, हॉल, नाट्य गृह असे काम अपेक्षित होते. जेणे करून राजापूर नगर परिषदेला उपन्नाचे साधन सुद्धा निर्माण होईल. त्यासाठी ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी आवश्यक डिझाईन्स आणि आवश्यक परवानग्या यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर या ठिकाणी व्यापारी गाळे आणि भव्य नाट्यगृह या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भूमिपूजन कार्यक्रमाला त्यावेळचे खासदार सुरेश प्रभू व तत्कालीन विधान परिषद आमदार अनंत तरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली. ॲड. खलिफे यांनी उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून निधी आणून सदर व्यापारी गाळे आणि नाट्य गृहाची इमारत पूर्ण करण्यात आली. आज राजापूर नगर परिषदेकडे सुसज्ज नाट्य गृह असून त्या नाट्यगृहात आता अनेक लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम संपन्न होतात. त्याचे भाडे राजापूर नगर परिषदेला मिळते. आज राजापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. कालांतराने हे नाट्यगृह काहीशा प्रमाणात नादुरुस्त झाले होते. त्यासाठी ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी पाठपुरावा करून तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून सुमारे चाळीस लाख रुपये एवढा निधी मंजूर करून घेतला आणि त्या नादुरुस्त नाट्य गृहाचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरण करण्यात आलेल्या नाट्य गृहाचे सुद्धा दिमाखात भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले. ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी सतत प्रयत्न करून, मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर झाला आणि आज हे नाट्य गृह दिमाखात उभे आहे. आज या नाट्यगृहात व्यापारी गाळे आहेत. एक शासकीय कार्यालय सुद्धा चालत आहे. ॲड. हुस्नाबानू खलिफे यांच्या या कार्याबद्दल आजही सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment