मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीला कोरोनाची लागण


 मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग आता अतिशय वेगानं फैलावू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा अतिशय झपाट्यानं वाढू लागली आहे. अशा या विषाणूच्या विळख्या एक अतिशय लोकप्रिय आणि लाडकी सेलिब्रिटी जोडीही आली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती या जोडिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आपण, घरीच विलगीकरणात असल्याचं सांगितलं. 


कोरोना संसर्ग झालेली ही जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामत. 'दुर्दैवानं उमेश आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही स्वगृहीच विलगीकरणात आहोत. गरजेची सर्व औषधं आणि आवश्यक ती काळजी आम्ही घेत आहोत. सर्व नियमांचं पालनही करत आहोत. कृपया मागील आठवड्यात आमच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करा किंवा काही दिवस विलगीकरणात राहा', असं आवाहन या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या